Friday 20 March 2015

दोन अथवा अनेक कॉम्प्युटर्सना एकमेकांना कसे जोडाल?



दोन किंवा जास्त कॉम्प्युटर्सना एकमेकांना जोडून त्यांचामध्ये  Networking  केले जाते. एकेकाळी अनेक कॉम्प्युटर्समध्ये Networking  करणे फार कठीण काम होते. परंतू सध्या वापरल्या जाणार्‍या विंडोज  XP  आणि VISTA  मध्ये कितीही कॉम्प्युटर्सना Networking  द्वारे एकत्रित जोडणे अगदी सोपे बनले आहे. या कामाला जास्तीत जास्त ५ मिनिटे लागतात आणि यासाठी कॉम्प्युटर हार्डवेअरच्या क्षेत्रातील इतर कुठल्याही अतिरिक्त माहितीची गरज नाही.
नेटवर्किंगचे फायदे खाली दिले आहेत.
१. नेटवर्किंगमधिल कॉम्प्युटर्समध्ये फाईलींची देवाणघेवाण सोपे होते. उदा. सीडी, पेन ड्राईव्ह अथवा फ्लॉपीची गरज नाही.
२. नेटवर्किंगद्वारे जोडलेल्या सर्व कॉम्प्युटर्सवर इंटरनेट वापरता येते.
३. नेटवर्किंगमधिल कुठल्याही कॉम्प्युटरवरुन कुठल्याही कॉम्प्युटरला जोडलेल्या प्रिंटरद्वारे प्रिंट काढता येते.
४. वेळ वाचतो.

दोन किंवा जास्त कॉम्प्युटर्समध्ये नेटवर्किंग कसे करावे.
अनेक कॉम्प्युटर्समध्ये नेटवर्किंग करण्यासाठी म्हणजेच त्यांना जोडण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. १) नेटवर्किंग स्विच, २) ईथरनेट (नेटवर्किंग) केबल.
नेटवर्किंग स्विच कॉम्प्युटर हार्डवेअरच्या दुकानामध्ये रु ५००/-  ते पूढे त्याच्या दर्जा आणि प्रकारानुसार मिळते. तर ईथरनेट (नेटवर्किंग) केबल रु १००/-  च्या पूढे तीच्या लांबीनुसार मिळते.
नेटवर्किंग स्विच त्याला असलेल्या पोर्टद्वारे (Port) ओळखले जाते. जसे ४ पोर्ट, १२ पोर्ट, २४ पोर्ट. हे पोर्ट म्हणजेच त्याला कॉम्प्युटर्स जोडण्याची व्यवस्था. जेवढे पोर्ट जास्त तेवढी त्याची किंमत जास्त. नेटवर्किंग स्विचला असलेल्या पोर्टला नेटवर्किंग केबलद्वारे कॉम्प्युटरला जोडता येते. ईथरनेट केबल आकाराने थोडीशी जाड व थोडीफार टेलिफोनच्या केबल प्रमाणे दिसते. या केबलला नेटवर्किंग स्विचला जोडण्यासाठी थोडा मोठा प्लग असतो तर तसाच प्लग आपल्या कॉम्प्युटरला अथवा लॅपटॉपला असतो. शक्यतो नविन कॉम्प्युटरला नेटवर्किंग करण्यासाठी प्लग असतो.
खालिल चित्रामध्ये नेटवर्किंग स्विच आणि कॉम्प्युटरला ईथरनेट केबलद्वारे जोडलेले दाखविले आहे. आपणास फक्त ईथरनेट केबलचे एक टोक स्विचमध्ये तर दुसरे टोक कॉम्प्युटरला जोडायचे आहे.
टीप :  या ठिकाणी कॉम्प्युटरला Restart  म्हणजेच कॉम्प्युटर बंद करुन पून्हा सुरु करावा लागेल.
१. आता ज्या कॉम्प्युटरला ती ईथरनेट केबल जोडली असेल तो कॉम्प्युटर सुरु करा. आता डेस्कटॉपवरील 'My Computer'  वर माऊसने राईटक्लिक करुन येणार्‍या छोट्या चौकोनातील 'Properties'  वर क्लिक करा.

२. आता आपल्यासमोर  'System Properties'  चा चौकोन सुरु होईल. त्यातील वरील बटणामधिल 'Computer Name'  वर क्लिक करा.

३. आता आपल्यासमोर त्याच चौकोनात 'Computer Name'  विभाग सुरु होईल. त्यातील ह्या बटणावर क्लिक करा.
४. आता आपल्यासमोर 'Computer Name Changes'  हा एक नविन छोटा चौकोन सुरु होईल. त्यामध्ये वरील जागेत Computer name:  या जागेत आपल्याला त्या कॉम्प्युटरला जे नाव द्यायचे असेल ते द्या. तर खालिल जागेमध्ये Workgroup: या जागेत  GROUP  हे टाईप करा.

५. आता आपल्यासमोर त्या कॉम्प्युटरच्या नविन Workgroup मध्ये आपले स्वागत आहे असा मॅसेज येईल. त्यातील ' OK '  वर क्लिक करा.

६. आता लगेचच आपल्यासमोर ' Restart this computer '  म्हणजेच कॉम्प्युटर बंद करुन पून्हा सुरु करण्यासाचा मॅसेज येईल. त्यातील ' OK '  वर क्लिक करा.

७. बस्स. इतकेच आपणास करायचे आहे. आता हिच क्रिया नेटवर्किंग मध्ये जोडलेल्या इतर कॉम्प्युटरवर करा.
टीप :  या ठिकाणी कॉम्प्युटरला Restart  म्हणजेच कॉम्प्युटर बंद करुन पून्हा सुरु करावा लागेल.
८. अशा प्रकारे सर्व कॉम्प्युटर्स जरी एकमेकांना जोडले गेले असले तरी आपल्या कॉम्प्युटरमधिल डेस्कटॉपवरील द्वारे पाहिल्यास आपणास इतर कॉम्प्युटर दिसणार नाहित.
' My Network Places ' म्हणजेच नेटवर्किंगमध्ये कॉम्प्युटर आणण्यासाठी त्याला शेअर (Sharing) करणे आवश्यक आहे.

९. कॉम्प्युटर शेअर (Sharing)  करण्यासाठी डेस्कटॉपवरील   सुरु करा. आता आपल्यासमोर कॉम्प्युटरमधिल [ Local Disk (C:) ], [CD-RW Drive (D:) ] दिसतील त्यावर माऊसने राईट क्लिक करा आणि त्यातील  Sharing and Security...  वर क्लिक करा.

१०. आता आपल्यासमोर ' Local Disk (C:) Properties '  चा चौकोन सुरु होईल. त्यातील खालिल चित्रामध्ये दाखविलेल्या ' .... click here  ' जागी क्लिक करा.

११. आता आपल्यासमोर ' Sharing ' चा विभाग सुरु होईल, त्यातील खालिल चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे 'Share this folder on network'  समोरील आणि खालिल वर क्लिक करुन त्याला सुरु करा.
१२. आता हिच क्रिया नेटवर्किंग मध्ये जोडलेल्या इतर कॉम्प्युटरवर करा आणि ते सर्व कॉम्प्युटर्स एकदा बंद करुन सुरु करा ते सर्व नेटवर्किंगमध्ये जोडले जातील.

टीप :
१. नेटवर्किंगमध्ये जोडलेल्या सर्व कॉम्प्युटर्सना इंटरनेट द्यायचे असल्यास ब्रॉडबँड इंटरनेटच्या आपल्याकडे आलेल्या ईथरनेट केबलला नेटवर्किंग स्विच मध्ये घातल्यास इंटरनेट आपोआप त्या सर्व कॉम्प्युटर्सवर सुरु होते.
२. नेटवर्किंगमध्ये जोडलेल्या ज्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असेल त्या प्रिंटरला जर नेटवर्कमध्ये आणायचे असल्यास. विंडोज Start  बटणामधिल  Settings  मधिल Printers and Faxes  बटणावर क्लिक करा. त्यातील आपणास ज्या प्रिंटरला शेअर (Sharing)  करायचे असेल त्याला वरील १०,११ क्रमांकामध्ये सांगितल्याप्रमाणे करुन नेटवर्कमध्ये जोडा.

मोफतचा फायदा दुप्पट



"जगात मोफत काहीच मिळत नाही"  असे आपल्याकडे बोलले जाते. पूर्वी ही गोष्ट खरी होती. कारण खरंच कुठलीही गोष्ट मोफत नसतेच. कारण ती निर्माण करणार्‍याला अथवा बनविणार्‍याला जर काही कष्ट पडले असतील तर तो ती गोष्ट (अथवा वस्तू) मोफत कशाला देईल. नक्कीच देणार नाही.
परंतू आता काळ बदलला आहे. खरंच.
हि गोष्ट तर तुम्ही नक्कीच मान्य कराल की आता काळ बदलला आहे. परंतू तरीही "जगात मोफत काहीच मिळत नाही"  हे देखिल आपण त्याच सुरात म्हणाल.
आपल्या इथे एक म्हण आजही प्रसिद्ध आहे की 'मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' ती आजच्या काळाला अगदी तंतोतंत जुळते. खाली त्याचे उदाहरण दिले आहे.
समजा तुम्ही पाच रुपयांची एखादी वस्तू आणली आणि दहा रुपयांना विकली तर तुम्हाला पाच रुपयांचा फायदा होतो. परंतु तीच वस्तू जेव्हा तुम्ही पाच रुपयांना विकत घेऊन पाच रुपयांनाच (न फायदा मिळविता) विकता तेव्हा तुम्हाला पंधरा रुपयांचा फायदा होतो. काहीही जास्त पैसे न घेता दहा रुपयांचा फायदा कसा होतो. हा लगेच प्रश्न निर्माण होतो. आणि इथेच वर सांगितलेली म्हण लागू होते. ज्याप्रमाणे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याच प्रमाणे आधी तुम्ही एखादी वस्तू त्याच किमतीला विकून तर बघा.
वरील उदाहरण वाचल्यानंतर लगेच पाच रुपयांना एखादी वस्तू आणू फायदा कसा होतो ते पाहू नका कारण हे उदाहरण आहे.
वरील उदाहरण व्यवस्थित कळण्यासाठी आपण एक चांगले आणि प्रसिद्ध उदाहरण पाहूया. 'गूगल अर्थ' प्रोग्रॅम आपण पाहिलाच असेल. गूगल कंपनीने करोडो रुपये खर्च करून 'गूगल अर्थ'  प्रोग्रॅम बनविला आणि सर्वांना मोफत दिला. गूगल.कॉम वरील सर्च आपण तर नेहमीच वापरत असाल. पण त्या व्यतिरिक्त गूगल कंपनी अनेक उपयोगी प्रोग्रॅम अगदी मोफत देते. मग याचा अर्थ ते सर्व प्रोग्रॅम बनविण्यासाठी करोडो रुपये खर्च करून मोफत द्यायला ती कंपनी किंवा त्या कंपनीचे पदाधिकारी मूर्ख आहेत का?
आपला हाच प्रॉब्लेम आहे, काही करण्याआधीच आपण अनेक प्रश्न विचारायला लागतो?
मोफतचा काळ आला आहे आणि आपण नशीबवान आहोत की या काळामध्ये आपण आहोत. आता गरज फक्त एका गोष्टीची ती म्हणजे या 'मोफत'  प्रकाराचा फंडा नक्की काय आहे ते समजून घेण्याचा.
तुम्हाला जर नक्कीच या 'मोफत'  फंडाचा वापर करायचा असेल आणि त्यासाठी थोडेफार पैसे खर्च करायला तयार असाल तर या बद्दल थोडासा विचार करा तुम्हाला नक्की उत्तर सापडेल आणि नाही सापडल्यास मला विचारु नका......

कॉम्प्युटर मधिल खेळातील म्हणजेच कॉम्प्युटर गेम्समधिल छुप्या गोष्टी.



कॉम्प्युटरवर खेळ ( Games ) खेळणार्‍यामध्ये दोन प्रकार असतात. १) चांगले खेळणारे २) साधारण खेळणारे. या दोन प्रकारातील 'चांगले खेळणारे'  कॉम्प्युटरवर खेळ खेळताना नेहमी जिंकत असतात आणि त्यांचा स्कोअर ( क्रमांक ) नेहमीच जास्त असतो. तर 'साधारण खेळणारे'  सतत आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करत असतात आणि क्वचित कधितरी जिंकतात. त्यांना खेळणार्‍यांचा नेहमीच हेवा वाटत असतो.
असो आपण कुठल्याही प्रकारचे खेळणारे असाल तरी या कुठल्याही कॉम्प्युटर खेळातील छुप्या गोष्टी नक्किच तुम्हाला 'चांगले खेळणारे'  बनवतील.
कॉम्प्युटर मधिल गेम्स बनविणार्‍या प्रत्येक प्रोग्रामरने आपल्या खेळामध्ये किती तरी छुप्या गोष्टी लपविलेल्या असतात, ज्या वापरल्याने तो खेळ चांगल्या प्रकारे खेळता येतोच सोबत इतरांपेक्षा जलद खेळत जिंकता देखिल येतो. या छुप्या गोष्टी त्या प्रोग्रामरने कि-बोर्डवरीलच बटणांमध्ये लपविलेल्या असतात. पण त्या वापरायच्या कशा ते मात्र त्या गेममध्ये सांगितलेले नसते. म्हणूनच या गोष्टी कोणालाच माहीत नसतात.
'गुगल' हे इंटरनेटवरील सर्च इंजिन आपणास त्या सर्व छुप्या गोष्टी शोधण्यासाठी मदत करेल. आपण खेळत असलेल्या 'खेळाचे नाव' व 'Hidden Keys'  किंवा 'Cheat Code'  असे टाईप करुन गुगलद्वारे शोधल्यास तो खेळ छुप्या गोष्टीच्या बटणांद्वारे कसा खेळायचा ती माहिती असलेल्या वेबसाईटची यादी समोर दिसेल. त्यातील एक दोन वेबसाईट्स चाळल्यास आपणास हव्या असलेल्या गेमच्या सर्व छुप्या गोष्टी आपणास कळतील.
टीप :- एक गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारे छुप्या गोष्टी वापरुन खेळताना इतराना त्या कळल्या नाहीत तरच बरे. एखादी जादू सर्वांना कळली तरच त्यात मज्जा राहत नाही. कळल ना ?

तुमच्या लॅपटॉपची अथवा कॉम्प्युटरची काळजी कशी घ्याल?



१. आपण ज्या ठिकाणी लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरवर काम करता ती जागा शक्यतो स्वच्छ असावी.
२. शक्यतो थंडगार वातावरणामध्ये काम करावे - लॅपटॉपवर एखाद्या मोठ्या सॉफ्टवेअरवर काम करताना लॅपटॉपची जास्त शक्ती वापरली जाऊन तो पटकन गरम होतो. म्हणून शक्यतो लॅपटॉपवर थंडगार वातावरणामध्ये काम करावे. तसेच लॅपटॉपच्या मागच्या बाजूस असलेल्या फॅनची जागा मोकळी असावी, जेणेकरून आतील गरम हवा व्यवस्थित बाहेर जाईल.
३. लॅपटॉपच्या स्क्रीनची काळजी घ्यावी - लॅपटॉपची स्क्रीन एल.सी.डी ( LCD - Liquid Crystal Display ) ची असल्याने ती फारच नाजुक असते. शक्यतो तिला हात अथवा बोट लावणे टाळावे. लॅपटॉपची स्क्रीन साफ करताना देखिल योग्य त्याच क्लिनिंगच्या साधनांनीच साफ करावी.
४. लॅपटॉपची बाळगताना - लॅपटॉप नेहमी व्यवस्थित हाताळावा. वजनाने हलका असल्याने तो कसाही हाताळू नये. तसेच एखाद्या ठिकाणी त्याला ठेवताना हळूवारपणे ठेवावे. प्रवासामध्ये त्याला जास्त धक्का लागणार नाही व जास्त हालणार नाही अशाच ठिकाणी ठेवावा.
५. लॅपटॉपजवळ पेय पिणे टाळावे - लॅपटॉपवर काम करताना शक्यतो कुठलेही पेय पिणे टाळावे. कारण चुकून त्याचा एखादा थेंब लॅपटॉपच्या कि-पॅडवर पडल्यास प्रॉब्लेम होवू शकतो.
६. धुरळा झटकावा - लॅपटॉपच्या स्क्रीनवर तसेच कि-पॅडवर धुरळा बसू देऊ नये. बर्‍याच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फक्त धुरळ्यामुळे बिघडतात.

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एखाद्या फाईलला पासवर्ड कसा द्यावा?



- मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एखादी नविन फाईल चालू करुन ती सेव्ह करण्यासाठी बटणांच्या वरील मेनूबारमधिल 'File' विभागातील 'Save' ह्या बटणावर क्लिक करा अथवा कि-बोर्डवरील 'Ctrl' (कंट्रोल) चे बटण दाबून 'S' हे बटण दाबा. आता कॉम्प्युटर आपणास वर्ड मधिल त्या फाईलीला साठविण्यासाठी नाव विचारेल. इथे आपणास हवे असलेले नाव द्यायचे तसेच त्या चौकोनातील वर उजवीकडे असलेल्या 'Tool' ह्या बटणावर क्लिक करावे. इथे मग अजून एक चौकोन येईल त्यातील 'Security Options' ह्या बटणावर क्लिक करावे. इथे आता आपल्यासमोर अजून एक 'Security' चौकोन उघडेल, या चौकोनातील वरच्या जागेमध्ये 'Password to open' असे लिहिलेले आढळेल. त्या पुढील चौकोनात आपणास हवा असलेला पासवर्ड द्यायचा व खालील 'OK' ह्या बटणावर क्लिक करावे, आता कॉम्प्युटर आपणास तोच पासवर्ड पुन्हा टाईप करायला सांगेल. इथे मघाचाच पासवर्ड पुन्हा देवुन 'OK' वर क्लिक करावे.
आता पुन्हा तोच मघाचाच फाईल साठविण्याचा चौकोन आपणास समोर दिसेल. इथे 'Save' ह्या बटणावर क्लिक केल्यास ती फाईल आपण दिलेल्या पासवर्ड सोबत साठविली जाईल व पुन्हा जेव्हा ती फाईल आपण उघडाल तेव्हा आपणास पासवर्ड विचारला जाईल.
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एखाद्या फाईलला पासवर्ड द्यायचा असल्यास तो सुरवातीलाच देता येतो. म्हणजे एखादी नविन फाईल सेव्ह [Save] करताना जेव्हा आपण त्या फाईलला नाव देतो तेव्हाच त्या फाईलला पासवर्ड देता येतो. परंतु जर तरीही आपणास एखाद्या आधीच साठविलेल्या फाईलला पासवर्ड द्यायचा असेल तर ती फाईल पुन्हा नवीन नावाने साठविणे आवश्यक आहे आणि अशावेळी नवीन नावाने ती फाईल साठविताना तिला पासवर्ड देता येतो.
अशाप्रकारे जर आपणास आधीच साठविलेल्या फाईलला पासवर्ड द्यायचा असेल तर ती फाईल उघडून बटणांच्या वरील मेनूबारमधिल 'File' विभागातील 'Save' ह्या बटणावर क्लिक करावे अथवा कि-बोर्डवरील 'F12' हे बटण दाबावे. आता कॉम्प्युटर आपणास तीच फाईल पुन्हा नवीन नावाने साठविण्यासाठी नाव विचारेल. इथे आपण वर सांगितल्याप्रमाणे पासवर्ड द्यावा.

कॉम्प्युटरमध्ये नविन फॉन्ट कसा टाकावा ?


फॉन्ट म्हणजे काय ?

कॉम्प्युटरमध्ये आपण जेव्हा काहीतरी टाईप करतो तेव्हा त्या तेव्हा उमटणार्‍या अक्षरांना फॉन्ट असे म्हणतात. मग ती कुठलीही भाषा आसो. टाईप केल्यावर येणार्‍या त्या अक्षरांना फॉन्ट असे म्हणतात. आपल्या कॉम्प्युटारमध्ये प्रामुख्याने इंग्रजी फॉन्ट असतात. म्हणून आपण जेव्हा किबोर्ड द्वारे टाईप करतो ( कुठेही आणि कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये ) तेव्हा कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर इग्रजी अक्षरे उमटतात. सध्या अनेक वेगवेगळ्या फॉन्टमध्ये वेगवेगळ्या शैलीची रचना असते. म्हणजे एका फॉन्टमधिल एखादे अक्षर हे जसे दिसते ती रचना दुसर्‍या फॉन्टमध्ये त्याच शब्दासाठी थोडी निराळी असते. आपल्या लिखाणातील अक्षरे निरनिराळ्यास्वरुपात / रचनेत दिसण्यासाठी निरनिराळ्या फॉन्टची निर्मिती केली गेली.
प्रत्येक फॉन्ट फाईलच्या स्वरुपात कॉम्प्युटरमध्ये साठविलेला असतो. फॉन्टची फाईल '.TTF' नावाने असते. उदा. आपल्या कॉम्प्युटरमध्ये असलेल्या 'Times New Roman' हा फॉन्ट सुद्धा 'Times New Roman.ttf' या नावाने असतो. '.TTF' हे त्या फॉन्टचे उरलेले नाव.
'TTF' म्हणजे 'True Type Font' विंडोज प्रमाणे इतरही ऑपरेटिंग प्रणालीमध्ये हा फॉन्टचा प्रकार चालतो.
कॉम्प्युटरमध्ये असलेल्या सर्व फॉन्टच्या फाईल्स प्रामुख्याने 'C:\Windows\Fonts' या जागी साठविलेल्या असतात.
कॉम्प्युटरमध्ये नविन फॉन्ट कसा टाकावा ?
नविन चांगले फॉन्ट मोफत कुठे मिळतील ?

कॉम्प्युटरमध्ये एखादे सॉफ्टवेअर कसे लोड ( Install ) करावे ?



सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन ( Software Installation ) म्हणजेच एखादे सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये टाकणे अथवा लोड करणे ही किचकट वाटणारी एक फारच सोपी गोष्ट आहे. मूळात एखादे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये लोड करताना कुठल्याही अधिक माहितीची गरज पडत नाही.
(१) आपण जे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये लोड करणार आहात त्याची जर Original  सीडी असेल तर ती कॉम्प्युटरमध्ये टाकताच एक प्रोग्राम आपोआप सुरु होईल किंवा (२) जर एखाद्या सीडी असलेले एखादे सॉफ्टवेअर जर तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये इंस्टॉल करायचे असेल पण जर सीडी कॉम्प्युटरमध्ये टाकताच त्यासाठीचा प्रोग्राम आपोआप सुरु झाला नाही किंवा (३) जर एखाद्या सॉफ्टवेअरच्या फाईल्स आपल्या कॉम्प्युटरमध्ये आधिच कॉपी केलेल्या असतील व आपणास फक्त तो सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये लोड करायचा असेल तर .....
सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये लोड करण्याची म्हणजेच इंस्टॉल करण्याची क्रिया खाली दिली आहे.
१) त्या सॉफ्टवेअरच्या फाईल्स सीडीवर अथवा कॉम्प्युटरमध्ये ज्या फोल्डरमध्य असतील तो फोल्डर उघडा.
२) त्या फोल्डरमध्ये तुम्हाला अनेक फाईल्स दिसतील त्यातील कुठल्याही फाईलवर डबल क्लिक ( Double Click )  करु नका.
३) त्याच फोल्डरमध्ये तुम्हाला  ' Setup '  नावाची फाईल आढळेल, लक्ष्यात असू द्या की तीथे एकापेक्ष्या जास्त ' Setup '  नावाच्या फाईल्स असण्याची शक्यता आहे.
४) जर त्या फोल्डरमध्ये ' Setup '  नावाच्या एकापेक्ष्या जास्त फाईल्स असतील तर ज्या फाईलच्या पूढे  असे   किंवा चित्र असेल तीलाच ( फक्त तीलाच ) डबल क्लिक ( Double Click ) करा.
टिप : बर्‍याच वेळा सॉफ्टवेअर बनविणारे इतरांना त्रास नको म्हणून सॉफ्टवेअरसाठी लागणार्‍या सर्व फाईल्सची मिळून एकच फाईल बनवितात अशावेळी ते त्या एकाच फाईलीला त्या सॉफ्टवेअरचेच चित्र  ( Icon )  देतात. अशावेळेस त्याच फाईलीवर  डबल क्लिक ( Double Click )  करावे.

• सर्वसाधारणपणे सर्व सॉफ्टवेअर्स लोड करण्याची क्रिया सारखीच असते, म्हणजे त्या सॉफ्टवेअरच्या फाईलीवर  डबल क्लिक ( Double Click )  केल्यानंतर एक प्रोग्राम सुरु होतो. त्यामध्ये आपण लोड करीत असलेल्या सॉफ्टवेअर नाव असते. आता काहिही न करता सरळ खाली दिलेल्या ' Next > '  या बटणावर क्लिक करा.

• अशाप्रकारे एक-दोन वेळा अजून ' Next > '  या बटणावर क्लिक करावे लागेल.
• पूढे त्याच चौकोनात त्या कॉम्प्युटरमध्ये आधिच लोड केलेल्या सॉफ्टवेअर्स यादी दाखवेल व वर आपण लोड करीत असलेल्या सॉफ्टवेअर नाव असेल, याचा अर्थ आपण लोड करीत असलेले सॉफ्टवेअर या यादमध्ये जमा होईल. आता खालिल ' Next '  या बटणावर क्लिक करा.

• आता आपल्यासमोर इंस्टॉलेशनची प्रक्रिया होताना दिसेल.

• बस्स. इतकेच करायचे आहे, थोड्याचवेळात आपल्यासमोर त्याच चौकोनात ' आपले सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये लोड झाले आहे '  असा संदेश येईल आणि ताच चौकोनात खाली असलेल्या
' Finish > '  या बटणावर क्लिक करा म्हणजे ती इंस्टॉलेशनची प्रक्रिया संपेल.

• आता तो सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये लोड झाला असेल, तपसण्यासाठी विंडोजमधिल  ' Start > Programs '  वर क्लिक करा, आपणास तीथे आपण लोड केलेल्या सॉफ्टवेअरचे नाव दिसेल.

इंटरनेटचा वेग (Speed) वाढवा!



आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा वेग (Speed)  वाढविण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरमध्येच सोय केलेली असते. प्रत्यक्षात इंटरनेटचा वेग हा आहे तेवढाच असतो, पण आपल्या कॉम्प्युटरमधिल विंडोजमध्येच एका जागी तो वेग थोडासा कमी केलेला असतो. याच जागी जर आपण वेग थोडासा कमी करण्याची कमांड बदलून व्यवस्थित दिल्यास थोड्याप्रमाणामध्ये  इंटरनेटचा वेग वाढू शकतो.
खाली दिल्याप्रमाणे जर आपण बदल केल्यास आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा वेग थोड्याप्रमाणामध्ये  वेग वाढू शकतो.
१) ''स्टार्ट' बटणावरील ' रन (Run...) ' या विभागावर क्लिक करा आणि त्याजागेमध्ये gpedit.msc  टाईप करुन 'OK' बटणावर क्लिक करा.

२) आता आपल्यासमोर "Group Policy"  नावाचा प्रोग्रॅम सुरु होईल.

३) या "Group Policy"  प्रोग्रॅमच्या डाव्या बाजूच्या जागेतील Local Computer Policy  मधिल Computer Configuration मधिल Administrative  Templates  मधिल Network  मधिल QoS Packet Scheduler  वर क्लिक करा.

४) आता उजव्या बाजूच्या जागेतील " limit reservable bandwidth "  वर डबल क्लिक करा.

५) आता आपल्यासमोर limit reservable bandwidth Properties  चा चौकोन उघडेल. त्यातील ' Enabled ' वर क्लिक करुन खालील जागेतील Bandwidth limit %  समोरील संख्या बदलून त्याजागी शून्य (०) ही संख्या टाईप करा आणि 'OK' बटणावर क्लिक करा.

६) आता पाहा पुढल्या वेळेसे इंटरनेट वापरताना थोडाफार फरक जाणवतो का?

कॉम्प्युटर स्लो झाल्यास रिस्टार्ट करायचे टाळा.


            बर्‍याच वेळेस कॉम्प्युटरवर भरपूर काम केल्याने अथवा भरपूर निरनिराळे सॉफ्टवेअर्स उघडून काम केल्याने कॉम्प्युटर त्या वेळेस थोडासा स्लो होतो म्हणजेच थोडासा हळू चालू लागतो. त्याची झालेली संथ गती आपल्या लक्षात आल्यानंतर आपण कॉम्प्युटर रिस्टार्ट करतो म्हणजेच बंद करुन पून्हा सुरु करतो. जेणे करुन त्याच्या मेमरी मध्ये निर्माण झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो.  या परीस्थितीवर चांगला पर्याय म्हणून आपण नेहमी तो कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करतो, म्हणजेच 'रीस्टार्ट'  करतो. मग या कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करण्याच्या वेळेमध्ये आपली २-३ मिनिटे वाया जातात.
              करताना थोडासा स्लो झालेला कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु केल्याने कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो. अशाप्रकारे कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्यावर कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'  करणे हा एकच पर्याय नाही. कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'   न करता देखिल स्लो झालेला कॉम्प्युटर व्यवस्थित करता येतो. असे करताना कॉम्प्युटरमधिल मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्याची क्रिया खाली दिली आहे.
१. कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर माऊसचे राईटक्लिक करुन येणार्‍या चौकोनातील 'New'  या विभागातील  "Shortcut"  या नावावर क्लिक करा.


२. आता आपल्यासमोर 'Create Shortcut'  चा चौकोन उघडेल.  त्यातील 'Type tye location of item:'  च्या खालील जागेमध्ये खाली दिलेली ठळक अक्षरातील ओळ कॉपी करुन त्याजागी पेस्ट करा व खालिल Next >  या बटणावर क्लिक करा.
%windir%\system32\rundll32.exe advapi32.dll,ProcessIdleTasks

३. आता पुढील चौकोनामध्ये 'Type a name for this shortcut'  च्या खालिल जागेमध्ये "Clear Memory"  असे टाईप करुन खालिल Finish  या बटणावर क्लिक करा.

४. असे केल्याने आता कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर  "Clear Memory"  नावाची एक फाईल तयार होईल. मग जेव्हा-जेव्हा आपणास कॉम्प्युटर स्लो झालेला जाणवेल तेव्हा कॉम्प्युटर 'रीस्टार्ट'  न करता फक्त या फाईलीवर डबलक्लिक करुन पुन्हा कॉम्प्युटरचा वेग सुरळीत करा.

तुमचा कॉम्प्युटर हळू [ Slow ] चालत असल्यास ?



बर्‍याच वेळा आपला कॉम्प्युटर स्लो झाला आहे व तो पूर्वी चांगला फास्ट चालायचा पण आता हळू चालतो असे वाटते.
कॉम्प्युटर हळू चालणे किंवा स्लो होणे ही खरी गोष्ट आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये बरेच सॉफ्टवेअर / प्रोग्राम्स टाकल्यामूळे आपला कॉम्प्युटर स्लो होतो असे सर्वांना वाटते. परंतु या व्यतिरीक्त इतर अनेक कारणांमूळे आपला कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.
कॉम्प्युटर मधिल अनेक अनावश्यक गोष्टी आपला कॉम्प्युटर स्लो करतात. आपल्या कॉम्प्युटरचा वेग [ Speed ] व्यवस्थित ठेवण्यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत.
१) कॉम्प्युटरमध्ये नेहमीच अनावश्यक तात्पुरत्या फाईली [ Temporary Files ] तयार होत असतात. खास करुन इंटरनेट वापरल्यास कॉम्प्युटरमध्ये अशा अनावश्यक अनेक फाईली तयार होतात. कॉम्प्युटर मधिल 'डिस्क क्लिन‍अप' [ Disk Cleanup ] ह्या प्रोग्रामद्वारे अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करता येतात.
Start - Programs - Accessories - System Tools मधिल Disk Cleanup वर क्लिक केल्यास चालू होणाऱ्या चौकोनात [ C/D: ] निवडून OK करावे. त्या नंतरच्या चौकोनात निरनिराळ्या विभागात असलेल्या अनावश्यक फाईलींनी व्यापलेली जागा दाखविली जाते. इथे पुन्हा 'OK' वर क्लिक केल्यास कॉम्प्युटर त्या सर्व विभागातील अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करतो. साधारण दर आठवड्याने अशा प्रकारे अनावश्यक फाईली नष्ट कराव्या.

२) दर आठवड्याला विंडोजच्या 'डेस्कटॉप' [ Desktop ] म्हणजेच सुरवातीच्या पानावरील 'रिसायकल बीन'  [ Recycle Bin ] उघडून ते संपूर्ण खाली करावे. रिसायकल बीन मधिल सर्व फाईली एकाच वेळी नष्ट करण्यासाठी त्यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या 'Empty the Recycle Bin' वर क्लिक करुन [ Delete ] करावे.


३) कॉम्प्युटर नेहमी त्यामध्ये साठविलेल्या फाईली इतरत्र साठवत असतो, यामूळे देखिल कॉम्प्युटर थोडाफार स्लो होतो.
- Start - Programs - Accessories - system Tool मध्ये Disk Defragmenter वर क्लिक करा. इथे चालू होणाऱ्या प्रोग्राममध्ये वरच्या बाजूस आपणास C: , D: असेकॉम्प्युटर मधिल विभाग दिसतील. सुरवातीला C: वर क्लिक करुन खाली असलेल्या Defragment ह्या बटनावर क्लिक करावे. हा प्रोग्राम इतरत्र पसरलेल्या फाईलींची देखिल व्यवस्थित मांडणी करतो. त्याचे हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण १-३ तास लागू शकतात. त्याला लागणारा हा वेळ कॉम्प्युटरमध्ये असलेल्या फाईलींवर अवलंबून असतो. आपला कॉम्प्युटर जेवढा भरलेला असेल तेवढाच त्याला जास्त वेळ लागतो.
या प्रोग्रामच्या खालच्या बाजूस % मध्ये काम किती शिल्लक आहे ते दाखविले जाते. अशा प्रकारे कॉम्प्युटरमध्ये Defragmenting दर पंधरा दिवसांनी केले तर कॉम्प्युटरच्या वेगामध्ये थोडाफार फरक दिसून येतो.

प्रसिद्धी कशी कराल?



तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारला की तुम्हाला अंदाजे किती लोक ओळखतात? तर याचे उत्तर देण्याआधी तुम्ही कुणाचा विचार कराल, तुमचे घरातले, शेजारचे, मित्र-मंडळी, विभागातील लोक, तुमच्या शाळेतील-कॉलेजमधील मित्र-मंडळी, तुमच्या ऑफिसमधील लोक, तुम्ही ज्याच्यासाठी आणि ज्यांच्या बरोबर काम करता ती लोक असे अंदाजे किती लोक सांगाल? अंदाजे ही संख्या ५०० पर्यंत जाईल पण १००० च्या वर जाणार नाही.
असो! तरी थोड्यावेळासाठी असे समजूया तुम्हाला १००० लोक ओळखतात. याचा अर्थ तुम्ही प्रसिद्ध आहात असा होत नाही. कारण तुम्हाला जी लोक ओळखतात त्यांनाही जवळपास तेवढीच लोक ओळखत असतील. मग यात प्रसिद्ध होण्याचा विषय येतच नाही.
प्रसिद्धीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक फायदे बरेच आहेत.
आता प्रसिद्धीचे फायदे काय आहेत ते सांगण्याची इथे गरज नाही. तुम्ही स्वतःला नक्कीच (इतरांप्रमाणे) हुशार समजत असाल. तर मग प्रसिद्धीचे फायदे तुम्हाला सांगण्याची गरजच नाही.
एखादी गोष्ट माहीत नसल्यास ती प्रत्यक्षात देखिल नसेल असे आपण बोलत नाही त्याऐवजी असू देखिल शकते हे उत्तर आपण देतो.
डोक्याची ट्यूब पेटल्यानंतर आणि पेटण्यापूर्वीची स्थिती तुम्हाला माहीत असेलच. आपल्या डोक्याची ट्यूब पेटण्यासाठी कुणाची मदतीची गरज नाही. थोडासा विचार केल्यास तुम्हाला देखिल बर्‍याच गोष्टी कळतील.
एका दिवसामध्ये १,००,००० लोकांना तुमच्याबद्दल अथवा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबद्दल कळल्यास काय होईल?
तुम्हाला वाटेल काही होणार नाही.
त्यापेक्षा असा विचार करा एका दिवसामध्ये जर १,००,००० लोक तुम्हाला अथवा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबद्दल माहिती कळल्यास या गोष्टीचा फायदा तुम्ही कसा करून घ्याल.
जरा विचार करा अशी कोणती गोष्ट असू शकते ज्यामुळे काही पैसे खर्च न करता तुम्ही अथवा तुम्हाला हवी असलेली गोष्ट प्रसिद्ध होईल. थोडासा विचार करा तुम्हाला उत्तर नक्की उत्तर सापडेल आणि नाही सापडल्यास मला विचारु नका......