Friday 20 March 2015

तुमचा कॉम्प्युटर हळू [ Slow ] चालत असल्यास ?



बर्‍याच वेळा आपला कॉम्प्युटर स्लो झाला आहे व तो पूर्वी चांगला फास्ट चालायचा पण आता हळू चालतो असे वाटते.
कॉम्प्युटर हळू चालणे किंवा स्लो होणे ही खरी गोष्ट आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये बरेच सॉफ्टवेअर / प्रोग्राम्स टाकल्यामूळे आपला कॉम्प्युटर स्लो होतो असे सर्वांना वाटते. परंतु या व्यतिरीक्त इतर अनेक कारणांमूळे आपला कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.
कॉम्प्युटर मधिल अनेक अनावश्यक गोष्टी आपला कॉम्प्युटर स्लो करतात. आपल्या कॉम्प्युटरचा वेग [ Speed ] व्यवस्थित ठेवण्यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत.
१) कॉम्प्युटरमध्ये नेहमीच अनावश्यक तात्पुरत्या फाईली [ Temporary Files ] तयार होत असतात. खास करुन इंटरनेट वापरल्यास कॉम्प्युटरमध्ये अशा अनावश्यक अनेक फाईली तयार होतात. कॉम्प्युटर मधिल 'डिस्क क्लिन‍अप' [ Disk Cleanup ] ह्या प्रोग्रामद्वारे अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करता येतात.
Start - Programs - Accessories - System Tools मधिल Disk Cleanup वर क्लिक केल्यास चालू होणाऱ्या चौकोनात [ C/D: ] निवडून OK करावे. त्या नंतरच्या चौकोनात निरनिराळ्या विभागात असलेल्या अनावश्यक फाईलींनी व्यापलेली जागा दाखविली जाते. इथे पुन्हा 'OK' वर क्लिक केल्यास कॉम्प्युटर त्या सर्व विभागातील अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करतो. साधारण दर आठवड्याने अशा प्रकारे अनावश्यक फाईली नष्ट कराव्या.

२) दर आठवड्याला विंडोजच्या 'डेस्कटॉप' [ Desktop ] म्हणजेच सुरवातीच्या पानावरील 'रिसायकल बीन'  [ Recycle Bin ] उघडून ते संपूर्ण खाली करावे. रिसायकल बीन मधिल सर्व फाईली एकाच वेळी नष्ट करण्यासाठी त्यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या 'Empty the Recycle Bin' वर क्लिक करुन [ Delete ] करावे.


३) कॉम्प्युटर नेहमी त्यामध्ये साठविलेल्या फाईली इतरत्र साठवत असतो, यामूळे देखिल कॉम्प्युटर थोडाफार स्लो होतो.
- Start - Programs - Accessories - system Tool मध्ये Disk Defragmenter वर क्लिक करा. इथे चालू होणाऱ्या प्रोग्राममध्ये वरच्या बाजूस आपणास C: , D: असेकॉम्प्युटर मधिल विभाग दिसतील. सुरवातीला C: वर क्लिक करुन खाली असलेल्या Defragment ह्या बटनावर क्लिक करावे. हा प्रोग्राम इतरत्र पसरलेल्या फाईलींची देखिल व्यवस्थित मांडणी करतो. त्याचे हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण १-३ तास लागू शकतात. त्याला लागणारा हा वेळ कॉम्प्युटरमध्ये असलेल्या फाईलींवर अवलंबून असतो. आपला कॉम्प्युटर जेवढा भरलेला असेल तेवढाच त्याला जास्त वेळ लागतो.
या प्रोग्रामच्या खालच्या बाजूस % मध्ये काम किती शिल्लक आहे ते दाखविले जाते. अशा प्रकारे कॉम्प्युटरमध्ये Defragmenting दर पंधरा दिवसांनी केले तर कॉम्प्युटरच्या वेगामध्ये थोडाफार फरक दिसून येतो.

No comments:

Post a Comment