कॉम्प्युटरवर खेळ ( Games ) खेळणार्यामध्ये दोन प्रकार असतात. १) चांगले खेळणारे २) साधारण खेळणारे. या दोन प्रकारातील 'चांगले खेळणारे' कॉम्प्युटरवर खेळ खेळताना नेहमी जिंकत असतात आणि त्यांचा स्कोअर ( क्रमांक ) नेहमीच जास्त असतो. तर 'साधारण खेळणारे' सतत आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करत असतात आणि क्वचित कधितरी जिंकतात. त्यांना खेळणार्यांचा नेहमीच हेवा वाटत असतो. असो आपण कुठल्याही प्रकारचे खेळणारे असाल तरी या कुठल्याही कॉम्प्युटर खेळातील छुप्या गोष्टी नक्किच तुम्हाला 'चांगले खेळणारे' बनवतील. कॉम्प्युटर मधिल गेम्स बनविणार्या प्रत्येक प्रोग्रामरने आपल्या खेळामध्ये किती तरी छुप्या गोष्टी लपविलेल्या असतात, ज्या वापरल्याने तो खेळ चांगल्या प्रकारे खेळता येतोच सोबत इतरांपेक्षा जलद खेळत जिंकता देखिल येतो. या छुप्या गोष्टी त्या प्रोग्रामरने कि-बोर्डवरीलच बटणांमध्ये लपविलेल्या असतात. पण त्या वापरायच्या कशा ते मात्र त्या गेममध्ये सांगितलेले नसते. म्हणूनच या गोष्टी कोणालाच माहीत नसतात. 'गुगल' हे इंटरनेटवरील सर्च इंजिन आपणास त्या सर्व छुप्या गोष्टी शोधण्यासाठी मदत करेल. आपण खेळत असलेल्या 'खेळाचे नाव' व 'Hidden Keys' किंवा 'Cheat Code' असे टाईप करुन गुगलद्वारे शोधल्यास तो खेळ छुप्या गोष्टीच्या बटणांद्वारे कसा खेळायचा ती माहिती असलेल्या वेबसाईटची यादी समोर दिसेल. त्यातील एक दोन वेबसाईट्स चाळल्यास आपणास हव्या असलेल्या गेमच्या सर्व छुप्या गोष्टी आपणास कळतील. टीप :- एक गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारे छुप्या गोष्टी वापरुन खेळताना इतराना त्या कळल्या नाहीत तरच बरे. एखादी जादू सर्वांना कळली तरच त्यात मज्जा राहत नाही. कळल ना ? |
---|
Friday 20 March 2015
कॉम्प्युटर मधिल खेळातील म्हणजेच कॉम्प्युटर गेम्समधिल छुप्या गोष्टी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment