Friday 20 March 2015

मोफतचा फायदा दुप्पट



"जगात मोफत काहीच मिळत नाही"  असे आपल्याकडे बोलले जाते. पूर्वी ही गोष्ट खरी होती. कारण खरंच कुठलीही गोष्ट मोफत नसतेच. कारण ती निर्माण करणार्‍याला अथवा बनविणार्‍याला जर काही कष्ट पडले असतील तर तो ती गोष्ट (अथवा वस्तू) मोफत कशाला देईल. नक्कीच देणार नाही.
परंतू आता काळ बदलला आहे. खरंच.
हि गोष्ट तर तुम्ही नक्कीच मान्य कराल की आता काळ बदलला आहे. परंतू तरीही "जगात मोफत काहीच मिळत नाही"  हे देखिल आपण त्याच सुरात म्हणाल.
आपल्या इथे एक म्हण आजही प्रसिद्ध आहे की 'मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' ती आजच्या काळाला अगदी तंतोतंत जुळते. खाली त्याचे उदाहरण दिले आहे.
समजा तुम्ही पाच रुपयांची एखादी वस्तू आणली आणि दहा रुपयांना विकली तर तुम्हाला पाच रुपयांचा फायदा होतो. परंतु तीच वस्तू जेव्हा तुम्ही पाच रुपयांना विकत घेऊन पाच रुपयांनाच (न फायदा मिळविता) विकता तेव्हा तुम्हाला पंधरा रुपयांचा फायदा होतो. काहीही जास्त पैसे न घेता दहा रुपयांचा फायदा कसा होतो. हा लगेच प्रश्न निर्माण होतो. आणि इथेच वर सांगितलेली म्हण लागू होते. ज्याप्रमाणे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याच प्रमाणे आधी तुम्ही एखादी वस्तू त्याच किमतीला विकून तर बघा.
वरील उदाहरण वाचल्यानंतर लगेच पाच रुपयांना एखादी वस्तू आणू फायदा कसा होतो ते पाहू नका कारण हे उदाहरण आहे.
वरील उदाहरण व्यवस्थित कळण्यासाठी आपण एक चांगले आणि प्रसिद्ध उदाहरण पाहूया. 'गूगल अर्थ' प्रोग्रॅम आपण पाहिलाच असेल. गूगल कंपनीने करोडो रुपये खर्च करून 'गूगल अर्थ'  प्रोग्रॅम बनविला आणि सर्वांना मोफत दिला. गूगल.कॉम वरील सर्च आपण तर नेहमीच वापरत असाल. पण त्या व्यतिरिक्त गूगल कंपनी अनेक उपयोगी प्रोग्रॅम अगदी मोफत देते. मग याचा अर्थ ते सर्व प्रोग्रॅम बनविण्यासाठी करोडो रुपये खर्च करून मोफत द्यायला ती कंपनी किंवा त्या कंपनीचे पदाधिकारी मूर्ख आहेत का?
आपला हाच प्रॉब्लेम आहे, काही करण्याआधीच आपण अनेक प्रश्न विचारायला लागतो?
मोफतचा काळ आला आहे आणि आपण नशीबवान आहोत की या काळामध्ये आपण आहोत. आता गरज फक्त एका गोष्टीची ती म्हणजे या 'मोफत'  प्रकाराचा फंडा नक्की काय आहे ते समजून घेण्याचा.
तुम्हाला जर नक्कीच या 'मोफत'  फंडाचा वापर करायचा असेल आणि त्यासाठी थोडेफार पैसे खर्च करायला तयार असाल तर या बद्दल थोडासा विचार करा तुम्हाला नक्की उत्तर सापडेल आणि नाही सापडल्यास मला विचारु नका......

No comments:

Post a Comment